swt1918.jpg
18849
शेर्ले ः महिलांना झाडांची रोपे देऊन अश्विता आरोसकर यांनी हळदीकुंकू साजरा केला.
शेर्लेत ओवी फाउंडेशनतर्फे
पर्यावरणपूरक हळदी-कुंकू
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः ओवी फाउंडेशन, शेर्ले यांच्या वतीने अश्विता आरोसकर यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभाने पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
पारंपरिक हळदीकुंकू समारंभाला सामाजिक जाणिवेची जोड देत त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळला आणि उपस्थित महिलांना पर्यावरणपूरक झाडांची रोपे वाण म्हणून देत एक आदर्श निर्माण केला. सद्य़स्थितीत राजकीय उदासीनता व अन्य कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत असताना, स्थानिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांतूनही सकारात्मक बदल घडवता येतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. झाडांची रोपे देऊन ''एक समारंभ-एक वृक्ष'' असा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचवला. या अभिनव उपक्रमामुळे महिलांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण झाली असून, पारंपरिक सण-समारंभ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली आहे. ओवी फाउंडेशन व अश्विता आरोसकर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.