कोकण

रत्नागिरीत पहिली यादी जाहीर

CD

शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
उदय सामंत ः महायुतीला गट, गणात शंभर टक्के यश मिळणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये महायुतीला जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळेल. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे, असे स्पष्ट करीत शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी रत्नागिरीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली.
रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी, संगमेश्वर व गुहागरमधील काही गटांच्या उमेदवारांची तर रत्नागिरी पंचायत समितीमधील काही गणांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. रत्नागिरी तालुक्यातून पावस गटामधून जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या ॲड. महेंद्र मांडवकर यांना शिवसेनेमधून उमेदवारी जाहीर केली. रत्नागिरी तालुक्यात खेडशी गटामधून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटामधून श्रध्दा दीपक मोरे, गोळप गटामधून नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, खालगाव गटातून शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी पंचायत समितीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, केल्येमधून सुमेश आंबेकर तर नाणीजमधून डॉ. पद्मजा कांबळे, साखरतरमधून परेश सावंत यांना उमेदवारी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केली आहे.
संगमेश्वरमध्ये कसबा गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना राजेंद्र महाडीक, मुचरी गटातून माधवी गिते, गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटामधून नेत्रा ठाकूर, पडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली.
सामंत म्हणाले, शिवसेना-भाजप युतीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युती करताना भाजपाला दिलेला शब्द जिल्हा परिषदेतही पाळला जाईल. राष्ट्रवादीसोबत चिपळूणमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असून संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी सोबत महायुतीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. लांजा-राजापूरमधील उमेदवार लवकरच जाहीर केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT