कोकण

रत्नागिरी-रत्नागिरी काँग्रेसची आज महत्वाची बैठक

CD

रत्नागिरी काँग्रेसची
आज महत्त्‍वाची बैठक
रत्नागिरी, ता. १९ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकींच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी रत्नागिरी तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक शहरातल्या ‘काँग्रेस भुवन’ येथे होणार आहे.
निवडणुकीच्यादृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी आणि पक्षबांधणीला गती देण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक सुरेश कातकर, जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद हे मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी संवाद साधला जाण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, जनसंपर्क आणि बूथ कमिटींचे सक्षमीकरण या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT