कोकण

पावस-सुधारित

CD

भाजपाचा पारंपरिक पावस गट शिवसेनेकडे
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ ः पावस जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे येथील विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झालेली आहे. भाजपाच्या पारंपरिक गटात शिवसेनेने ताकद निर्माण केली होती. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीत या गटावर भाजपकडून दावा केला जात होता. पण आयत्यावेळी ही जागा पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदे शिवसेनेकडे खेचून आणला आहे. त्यामुळे याठिकाणी दोन शिवसेना आमनेसामने येणार असून भाजपच्या भूमिकेवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेना व भाजपा युतीमुळे पावस गटामध्ये युतीच्या उमेदवाराचे मताधिक्य घटले. पण विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत यांना अल्पसंख्यांकांसह विशिष्ट समाजाची मते पडल्यामुळे मताधिक्य वाढले होते. निवडणुकीतील प्रचारात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपा कार्यकर्ते सुशांत पाटकर यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले होते. त्यानुसार ही जागा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला मिळेल अशी आशा होती. परंतु ही जागा शिवसेनेनेकडे गेली आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराला वरिष्ठांकडून जैसे थे राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पावस गटात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी असतानाही आणि शिवसेनेकडे गेले अनेक वर्ष तळागाळापर्यंत काम करणारे कार्यकर्ते असतानाही या गटातून गोळपमधील महेंद्र मांडवकर यांना रिंगणात उतरवले आहे. स्थानिक उमेदवाराला नाकारल्यामुळे या जिल्हा परिषद गटांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.
यावेळी पावस जिल्हा परिषद गटात ओबीसी उमेदवाराला संधी देतानाच दुसऱ्या गटातून उमेदवार आयात केल्यामुळे सध्या नाराजीचे वातावरण आहे. ठाकरे शिवसेनेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. ठाकरे शिवसेनेचे रविकिरण तोडणकर यांनी या गटात ठाकरे शिवसेना मजबूत ठेवलेली आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपाला दोन पंचायत समितीच्या जागा सोडल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पावस जिल्हा परिषद गटात कामाला लागा, असे आदेश असतानाच अचानकपणे ''थांबा'' असे आदेश आल्याने कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT