कोकण

विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती कार्यक्रम

CD

विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण-मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दी न्यू इंग्लिश स्कूल (ता. संगमेश्वर) येथे जनजागृती कार्यक्रम नुकताच झाला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री भ्रूणहत्येचे सामाजिक दुष्परिणाम, त्यास प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आणि ‘घर घरमें न्याय’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते. या वेळी अॅड. अमित शिरगावकर पॅनल विधिज्ञ धनंजय शेट्ये सचिव, व्यापारी पैसाफंड सो. संगमेश्वर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे, मुख्याध्यापक सचिन खामकर व पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सचिव पाटील यांनी स्त्री भ्रूणहत्या हा गंभीर सामाजिक गुन्हा असून, त्यावर कठोर शिक्षेची तरतूद आहे. याबाबत माहिती देत महिलांचे हक्क, कायदेशीर संरक्षण व मोफत कायदेशीर मदत सेवांबाबत मार्गदर्शन केले. अॅड. अमित शिरगावकर यांनी स्त्री भ्रूणहत्येला प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या तरतुदी, गुन्ह्यांचे परिणाम व नागरिकांची जबाबदारी या विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे महत्व तसेच घर घरमें न्याय या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत न्याय पोहोचवण्याच्या संकल्पनेवर भर देण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT