कोकण

सावर्डे- महाविद्यालयाचे १० विद्यार्थी करिअर संसद अधिवेशनात

CD

- rat२०p५.jpg-
२६O१८९६२
सावर्डे : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सोबत विद्यार्थी.

करिअर संसद अधिवेशनात
सावर्डे महाविद्यालयाचे विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २१ ः बारामती येथे पार पडलेल्या पाच दिवसीय राज्यस्तरीय ‘करिअर संसद’ अधिवेशनात सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयाच्या अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्‍घाटन उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी राजेंद्र पवार, प्रफुल्ल पाठक, आयआरएस अधिकारी तुषाबा शिंदे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, ‘एआयच्या युगात आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. करिअर कट्ट्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना भविष्यासाठी योग्य दिशा मिळत आहे.’
अधिवेशनात सावर्डे महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी या अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये स्नेहल खोपे, रोजिना साबळे, पवित्रा बरगुकर, सानिया कदम, सृष्टी पवार, यश गुजर, दीक्षा चव्हाण, वैष्णवी घाणेकर, संयोग घाणेकर आणि शौनक बोरगांवकर यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT