rat२०p६.jpg-
P२६O१८९६३
चिपळूण ः महानिर्मिती कंपनीअंतर्गत आयोजित आंतरविद्युत केंद्र नाट्यस्पर्धेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रफुल्ल कुटमाटे. सोबत मुख्य अभियंता संजय चोपडे व औद्योगिक अधिकारी पुरुषोत्तम खेडेकर आदी.
----
चिपळूण रंगमंचावर वीजकेंद्रांची नाट्यऊर्जा
महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन; दहा नाटकांची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः राज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनीअंतर्गत आयोजित आंतरविद्युत केंद्र नाट्यस्पर्धेचे चिपळूण येथे काल (ता. १९) उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर कोयना जलविद्युत केंद्रातर्फे सकाळच्या सत्रात ‘कार्टी नंबर वन’ हे तुफान विनोदी तसेच संध्याकाळच्या सत्रात पारस औष्णिक विद्युतकेंद्रातर्फे ‘बातमीची गोष्ट’ हे सामाजिक विषय घेऊन नाटक सादर झाले. दोन्ही नाटकांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही नाट्यस्पर्धा पंचवीस वर्षानंतर कोकणात होत असल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही नाट्यस्पर्धा सुरू आहे. पुढील पाच दिवस वेगवेगळे नाटक सादर केले जाणार आहेत. दररोज दोन नाटक सादर केले जातील. आज सकाळी कार्यक्रमाला प्रमुख्य अतिथी म्हणून मुंबई येथील महानिर्मितीचे नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मुख्य अभियंता प्रफुल्ल कुटेमाटे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोयना वीज संकुलनाचे मुख्य अभियंता संजय चोपडे, कोयना वीजकेंद्रातील अधीक्षक अभियंता संतोष चव्हाण, एम. सी. गायकवाड, रोहिदास आव्हाड, कल्याण अधिकारी प्रसाद निकम उपस्थित होते. पंचवीस वर्षानंतर या नाट्यस्पर्धा कोकणात होत असल्यामुळे कोकणातील चिपळूण शहरात होत असल्यामुळे कोकणचे विशेष असे ‘कोकणी गाऱ्हाणे’ घालून नाट्यस्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्या आधी प्रमुख अतिथींचे तुतारी, ढोल ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. पाच दिवस चालणाऱ्या या नाट्यस्पर्धेतील दहा नाटकांमध्ये विविध सामाजिक विषय तसेच धमाल विनोदी नाटकं सादर केली जाणार आहेत.
---
कलागुणांना वाव
महाराष्ट्रातून वीजनिर्मितीच्या विविध केंद्रातून आलेल्या नाट्यकर्मींना संबोधित करताना वीजनिर्मितीसारख्या अत्यावश्यक सेवेत काम करत असतानाही आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि दैनंदिन कामकाजातून थोडासा वेळ काढून विरंगुळा मिळावा तसेच कर्मचाऱ्यांतील संघभावना वाढीस लागून स्वतःसोबतच कंपनीचीही प्रगती व्हावी, असा नाट्यस्पर्धा आयोजनाचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.