कोकण

अभ्यंकर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी

CD

rat२०p१६.jpg-
P२६O१८९७५
रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी शालेय दिन कार्यक्रमात सुरेख नृत्य सादर करून वाहव्वा मिळवली.

अभ्यंकर विद्यामंदिरात शालेय दिन
नृत्य-नाट्य सादरीकरणाने रंगत ; विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. भारतीय संस्कृती दाखवणारी तसेच लोककला आणि विविध प्रकारची नृत्ये सादर करून वाहव्वा मिळवली.
पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. यश प्रसादे यांनी केले. या वेळी शाळेच्या विभागप्रमुख शुभांगी वायकुळ, व्यवस्थापक पद्मश्री आठल्ये, मुख्याध्यापक विनोद नारकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकनामधील शाळेला मिळालेल्या ए प्लस मानांकनाबद्दल माहिती देऊन शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नाट्यछटा, गणित प्रावीण्य, गीताध्याय पाठांतर, कथाकथन या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक, परंपरेचा वारसा कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडला. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी जाकडी नृत्य, दिंडी, नाट्यछटा तसेच अन्य कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी डॉ. चेतन औरंगाबादकर यांच्या हस्ते शालेय दिनाच्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. संस्थेच्या कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर, सचिव राजीव गोगटे, व्यवस्थापक पद्मश्री आठल्ये, मुख्याध्यापक विनोद नारकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नाटक, नाट्यछटा, भारतातील विविध लोकनृत्यांचे सादरीकरण प्रभावी केले. रामायण, कृष्ण, दिंडी, छावा महाराष्ट्राचा, छत्रपती शिवरायांचा पोवाडा या नृत्यगीतांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT