कोकण

''जिव्हाळा'' सेवाश्रमातील वृध्दांची आरोग्य चिकित्सा

CD

swt207.jpg
18986
माड्याचीवाडीः जिव्हाळा सेवाश्रम येथे फिजिओथेरपी शिबिर घेण्यात आले.

‘जिव्हाळा’ सेवाश्रमातील
वृध्दांची आरोग्य चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या जयंतीनिमित्त सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे मोफत फिजिओथेरपी शिबिर पार पडले. हे शिबिर बॅ. नाथ पै संस्था, सिंधुदुर्ग, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व जिव्हाळा सेवाश्रम यांच्यावतीने आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये वृद्ध, अपंग व गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत फिजिओथेरपी उपचार देण्यात आले. अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमास जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे, सदस्य अरुण, सल्लागार समिती सदस्य जयप्रकाश प्रभू, भाविदास गावडे,  प्राजक्ता केळुसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे कौतुक करताना श्रीमती ओटवणेकर यांनी, जिव्हाळा सेवाश्रमामार्फत गरजू व दुर्लक्षित घटकांसाठी राबविले जाणारे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी आहेत. बॅ. नाथ पै यांच्या सामाजिक विचारांना व कार्याला अभिवादन करण्याचा हा उपक्रम असून, भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT