कोकण

ई-पीक पाहणीसाठी २४ पर्यंत मुदतवाढ

CD

ई-पीक पाहणीसाठी
२४ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी ः ई-पीक पाहणी ‘डीसीएस’ मोबाईल ॲपच्या साहाय्याने रब्‍बी हंगाममध्‍ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत १४ जानेवारीपर्यंत होती. मात्र, काही शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करणे शिल्‍लक असल्याने २४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्‍यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७-१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या रब्‍बी पिकांची नोंदणी १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्राच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, खरीप व रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास गावासाठी नेमणूक केलेल्या पीक पाहणी सहाय्यकांची मदत घ्यावी. सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी २४ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
...................
पारनेरला २७ पासून
विशाल भंडारा सोहळा
कुडाळ ः जगतगुरू तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या सानिध्यात परमेश्वर कबीर यांच्या ५०८ व्या निर्वाण दिनानिमित्त विशाल भंडारा सोहळा २७ ते २९ जानेवारी या कालावधीत सतलोक आश्रम, ढवळपुरी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे आयोजित केला आहे. यावेळी संत गरीबदासजी महाराजांच्या अमरवाणीचे अखंड पाठ होणार आहेत. या विशाल भंडारा सोहळ्यात हुंडा मुक्त विवाह, रक्तदान शिबिर, निःशुल्क नामदीक्षा,  अध्यात्मिक प्रदर्शनी यांसारख्या भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या भंडारा उत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सतलोक आश्रम नामदान केंद्र सिंधुदुर्ग-कुडाळचे दिलीप दास यांनी केले आहे.
..................
‘प्रेरणा साहित्य’चा
उद्या मासिक कार्यक्रम
सावंतवाडी ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक त्रेसष्ठावा कार्यक्रम गुरुवारी (ता. २२) दुपारी ३.३० वाजता सातार्डा येथील महापुरुष मंदिरात आयोजित केला आहे. साहित्यिक (कै.) रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आखलेल्या ‘शब्दांचा जादूगार रवींद्र पिंगे’ या कार्यक्रमात पिंगे यांचे जीवन व साहित्य यावर प्रा. गजानन मांद्रेकर, विनय सौदागर बोलतील; तर साहित्य कट्ट्याचे अन्य सदस्य पिंगेच्या ललित लेखांचे वाचन करतील. सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय यांच्या सहयोगाने होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्टा-आजगाव आणि सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय यांच्यावतीने विनय सौदागर, ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी केले आहे.
....................
कुडाळात उद्या
गुरे पकड मोहीम
कुडाळ ः कुडाळ शहर व लगतच्या परिसरात मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळे, अपघात तसेच नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीमार्फत गुरुवारी (ता. २२) शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. कोंडवाडा अधिनियमानुसार पकडण्यात येणाऱ्या मोकाट गाई-गुरांना सरसोलीधाम येथील गोशाळेत ठेवण्यात येणार आहे. गुरे पकडल्यानंतर गोशाळा शुल्क तसेच देखभालीसाठी होणारा संपूर्ण खर्च संबंधित गुरांच्या मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. संबंधित मालकांनी विहित मुदतीत आपली गुरे ताब्यात न घेतल्यास नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

Pune Cycle Race: पुण्यातल्या सायकल स्पर्धेबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; स्पर्धकांच्या दिमतीला दोन विशेष पथके

Pune Water Crisis : पुण्यातील पाणीपुरवठा संकट; दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका, महापालिकेची तातडीची उपाययोजना

Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

SCROLL FOR NEXT