कोकण

महासंघ नेहमीच व्यापाऱ्यांसोबत

CD

19026

महासंघ नेहमीच व्यापाऱ्यांसोबत

प्रसाद पारकर ः तळेरेत आदर्श व्यापारी संघटनेचा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २० : व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचा अभ्यास महासंघ करत असतो. त्यादृष्टीने योग्य ते निर्णय महासंघ नेहमीच घेत आला आहे. व्यापाऱ्यांसाठी आयोजित करत असलेल्या उपक्रमांना यापुढेही सहकार्य करू, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले. ते तळेरे आदर्श व्यापारी संघटनेच्या ६९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. पारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, सहकार्यवाह तथा तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, माजी सभापती दिलीप तळेकर, रमाकांत वरुणकर, कार्याध्यक्ष अमोल सोरप, सत्कारमूर्ती सदाशिव पांचाळ, देवकी तळेकर, सचिन पावसकर, श्रीपत पाताडे, प्रतिभा पाटील, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पपी वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. कुलकर्णी, शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सावी मुद्राळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवकी तळेकर, तळेरे विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, सदाशिव पांचाळ यांना सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा यशस्वी उद्योजक पुरस्कार सचिन पावसकर यांना, उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आदित्य महाडिक, उत्कृष्ट सामाजिक संस्था श्री गणेशकृपा सांस्कृतिक उत्कर्ष मंडळ, कासार्डे बंडवाडी यांना देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक, आभार आणि सूत्रसंचालन राजू जठार यांनी केले. त्यानंतर श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ आणि तारादेवी फुगडी मंडळ केळुस-वेंगुर्ले यांचा फुगडी सामना, कुडाळ येथील ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
व्यवसायात आपुलकी महत्त्वाची!
डॉ. कुलकर्णी यांनी, आपल्या व्यवसायात आपुलकी जेवढी वाढेल, तेवढेच स्पर्धेत आपण पुढेच असणार आहोत. स्पर्धा करताना आधुनिकतेकडेही वळले पाहिजे, असे सांगितले. राजू जठार यांनी, पुढील एक वर्ष परिवर्तन वर्ष साजरे करणार आहोत. त्यासाठी चिंतन शिबिर आयोजित करून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT