कोकण

रत्नागिरी-सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरण व्यवस्था कोलमडली

CD

19119
सर्व्हरच्या समस्येने धान्य वाटपात अडथळा
पंधरा दिवसांपासून पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; लाभार्थी झाले हैराण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : जिल्ह्यात सर्व्हर डाऊनमुळे रास्त धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. ही समस्या केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नाही, तर राज्यभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे धान्य वाटपास ब्रेक लागला आहे. नेटवर्क आल्यानंतर धान्य दिले जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून पॉस मशीन चालू, बंद होत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार आणि रेशनकार्डधारक हैराण झाले आहेत.
धान्य वाटप करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने राज्यासह जिल्ह्यात नवीन पॉस मशीन देण्यात आले. त्यामुळे धान्य वितरण सुरळीत सुरू होते; मात्र आता पॉस मशीनला कधी नेटवर्क, कधी सर्व्हर डाऊन, साईट बंदची समस्या भेडसावत आहे. नेटवर्क नसेल तर धान्य वाटपाला विलंब होत आहे. गेल्या वर्षापासून नवीन फोरजी पॉस मशीन वाटप केल्या आहेत. त्यामुळे धान्य वाटप सुरळीत होऊन धान्य वाटपासंदर्भात तक्रारी कमी झाल्या होत्या; परंतु मागील काही महिन्यांपासून तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून पॉस मशीनला सर्व्हर, नेटवर्क, साईटची समस्या येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान्य वाटपास अडचण होत आहे.
काही दुकानदार तक्रारी येऊ नयेत म्हणून लाभार्थ्यांना रेशनकार्ड ठेवून धान्य देतात. त्यानंतर ओटीपीसाठी संपर्क करून त्यांची माहिती भरली जात आहे. काही ठिकाणी नेटवर्क, साईट समस्या असल्याचे सांगून नंतर येण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी वैतागले आहेत. नव्या वर्षांत पॉस मशीनची समस्या येत असल्यामुळे रेशन दुकानदार हताश झाले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून या संदर्भात राज्य पुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

चौकट
समस्या दूर होणे गरजेचे
सर्व्हर, नेटवर्कची समस्या काही ठिकाणी येत आहे. ती समस्या कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे यंत्रणा कमी आहे. सर्व्हरची समस्या आली तर सर्वच ठिकाणी येते. नेटवर्कची समस्या काही प्रमाणात तालुक्यात आहे. जर ऑफलाईन धान्य दिले तर दुकानदारांना कमिशनची समस्या येते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनेच धान्य वितरण होते. सर्व्हरची समस्या असेल तर राज्य पुरवठा विभागाकडून ती समस्या दूर होणे गरजेचे आहे, असे रास्त दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले.

कोट
साईट प्रॉब्लेम, नेटवर्क समस्येमुळे पॉस मशीन बंद पडत आहे. त्यामुळे धान्य देताना दुकानदारांना अडचणी येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात पॉस मशीनच्या तक्रारी आहेत. साईट सुरू झाल्यानंतर धान्य वाटप होत आहे. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Sangli ZP : “चार तालुके सुरक्षित, सहा तालुक्यांत काँग्रेसची कसोटी!” सांगली राजकारणात अस्तित्वाची लढाई

KDMCमध्ये राजकीय उलथापालथ! सत्तेसाठी शिंदेंची खेळी, मनसेच्या पाठिंब्यानं समीकरणच बदललं; भाजपसह उद्धव ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT