कोकण

सुवासिनींना ‘नेत्र चिकित्से’चे वाण

CD

19092

सुवासिनींना ‘नेत्र चिकित्से’चे वाण

आगळे ‘हळदी-कुंकू’; आरोस विद्या विकास प्रशाळेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २० ः आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये महिलांसाठी प्रशालेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाबरोबरच हळदी-कुंकू समारंभाला येणाऱ्या सर्व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने व सरस्वती देवी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष किशोरी मडुरकर, नेत्र चिकित्सक डॉ. दीपाली कदम, शिक्षिका देवयानी चव्हाण, श्रद्धा मुळीक, मिताली नाईक, कृपा नेमळेकर तसेच माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
डॉ. कदम यांनी उपस्थित महिलांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. डोळ्यांचे आरोग्य कसे चांगले राहील, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नॅब नेत्र रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबतही मार्गदर्शन केले.
देवयानी चव्हाण यांनी, आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हाती आहे. आरोग्याबाबत आपण नेहमी सतर्क राहिली पाहिजे, असे सांगत शिबिर आयोजनात सहकार्य केल्याबद्दल अर्जुन मुळीक यांचे आभार व्यक्त केले. उपस्थित सर्व महिलांना प्रशालेच्या वतीने हळदी-कुंकू तसेच वाण देण्यात आले.
सावंतवाडी-भटवाडी येथील नॅब नेत्र रुग्णालयातर्फे उपस्थित महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी नॅबचे डॉ. संतोष कदम, डॉ. रुपाली कदम, सहाय्यक प्रज्ञा शेवाळे, कर्मचारी संजय परब यांनी सहकार्य केले. श्रद्धा मुळीक यांनी सूत्रसंचालन केले. देवयानी चव्हाण यांनी प्रस्तावना केली. मिताली नाईक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT