कोकण

अवजड वाहतूक बंद करा; अन्यथा सोमवारी आंदोलन

CD

अवजड वाहतूक बंद करा;
अन्यथा सोमवारी आंदोलन

बांदावासीयांचा प्रशासनास इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः बांदा-दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने सोमवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला. याबाबत शहरातील निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गडगेवाडी, चर्मकारवाडी (बांदेकरवाडी) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की निमजगा, गवळीटेंब शेटकरवाडी, गडगेवाडी, चर्मकारवाडी (बांदेकरवाडी) ग्रामस्थांच्यावतीने यापूर्वी २ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान स्मरणपत्र संबंधित खात्याकडे दिले होते. यामध्ये अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेल्या गंभीर व धोकादायक स्थितीकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधत तातडीची कारवाई करून अवजड वाहतूक बंद करण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महिला, विद्यार्थी व नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT