-ratchl२०२.jpg-
P२६O१९१०४
चिपळूण ः विषय समित्यांच्या सभापतिपदी निवड झालेल्या नगरसेवकांसमवेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी.
------
चिपळुणातील विषय समित्या बिनविरोध
भाजप–शिंदेसेनेचे प्रत्येकी तीन सभापती ; पालिकेची प्रक्रिया पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः चिपळूण पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुका आज बिनविरोध झाल्या. यामध्ये सहा विषय समित्यांपैकी तीन समित्यांवर भाजपने तर तीन समित्यांवर शिंदेसेनेने वर्चस्व राखले. या निवडणूक प्रक्रियेत मुख्याधिकारी विशाल भोसले हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते.
शहरातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या विषय समित्या निवडणुकीत पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी शिंदेसेनेचे निहार कोवळे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती ही उपनगराध्यक्षांसाठी पदसिद्ध समिती म्हणून गठीत करण्यात आली. या समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या रसिका देवळेकर, उपसभापतीपदी शिंदेसेनेच्या पल्लवी महाडिक यांची तर स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी भाजपचे शुभम पिसे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी शिंदेसेनेचे कपिल शिर्के तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतिपदी शिंदेसेनेच्या हर्षाली पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सर्व नियमांचे वाचन केले. त्यानंतर समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी चर्चा झाली. सदस्यसंख्या सात असावी, असा ठराव मिथिलेश नरळकर यांनी मांडला तर काँग्रेसच्या सफा गोठे यांनी अनुमोदन दिले.
तौलनिक संख्याबळानुसार, समित्यांमध्ये सदस्यांची विभागणी करण्यात आली. त्यानुसार सात सदस्यीय समित्यांमध्ये शिंदेसेनेचे दोन, भाजपचे दोन, उद्धवसेनेचा एक, काँग्रेसचा एक सदस्य तर तीन समित्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक सदस्य तर उर्वरित तीन समित्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक सदस्य अशी निवड करण्यात आली. या वेळी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, सचिन शिंदे, संतोष शिंदे यांच्यासह पालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--------
चौकट
मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक
मुख्याधिकारी विशाल भोसले यांची बदली झाल्याने चिपळूण पालिकेतील त्यांचीही शेवटची कौन्सिल सभा होती. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, फैसल कासकर, योगेश पवार, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, अंकुश आवले, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर आदी सर्वांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. मुख्याधिकाऱ्यांनी चिपळूण शहराला एका वेगळ्या उंचीवर नेल्याचे सर्वांनी सांगितले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.