-rat२०p२९.jpg-
P२६O१९१०२
रत्नागिरी : रामचंद्र सप्रे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचे विविध गटांतील विजेते. मागे बसलेले मान्यवर.
--------
मुंबईच्या निर्वाण शाहचे राज्य बुद्धिबळ स्पर्धेत वर्चस्व
रामचंद्र सप्रे स्मृती स्पर्धा ; महाराष्ट्र संघाची निवड; सौरीशसह नऊ जणांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद विजेते कै. रामचंद्र सप्रे स्मृती एच२ई-पॉवर सिस्टिम प्रस्तुत महाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता मुंबईचा निर्वाण शाह ठरला. पुढील महिन्यात होसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नऊ जणांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून, रत्नागिरीच्या सौरीश कशेळकर याचाही या संघात समावेश झाला आहे.
मराठा भवन येथे तीन दिवस ही स्पर्धा सुरू होती. बक्षीस वितरण समारंभाला उद्योजक व चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी मंगेश मोडक व नितीन कानविंदे उपस्थित होते.
---
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. या संघात इंद्रजित महिंद्रकर (छत्रपती संभाजीनगर), आदित्य सावळकर (कोल्हापूर), निर्वाण शाह (मुंबई शहर), सौरिश कशेळकर (रत्नागिरी), संघर्ष अवळे (चंद्रपूर), अभिजय वाळवेकर (पुणे), साजिरी देशमुख (सातारा), महुआ देशपांडे (मुंबई उपनगर), प्रिशा घोलप (रायगड), शर्वरी कबनूरकर (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
-------
चौकट २
सविस्तर निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)
खुला गट: निर्वाण शाह, इंद्रजित महिंद्रकर, सौरिश कशेळकर, आदित्य सावळकर, अनिश गोडसे, कौस्तव बराट, संजय शेजळ, शुभम लाकूडकर, संघर्ष औळे, विहान अग्रवाल. २००० रेटिंगखालील गट सागर शेनॉय, आदित्य चव्हाण, गणेश ताजणे, वरद पाटील, ऋषिकेश कबनूरकर. १७०० रेटिंगखालील गट अभिजय वाळवेकर, वरद मोरे, श्रीश कुलकर्णी, नोव्हा अय्यर जुयाल, अंबर गंगवाल. सर्वोत्तम महिला प्रिशा घोलप, शर्वरी कबनूरकर, साजिरी देशमुख, महुआ देशपांडे, दुर्वा बोम्बळे. १५ वर्षांखालील गट- सर्वेश पोतदार, आराध्य केंजळे, आरूष सरोदे, वेदांग असनीकर, ऋतुराज पांचाळ. १३ वर्षांखालील गट- ओम रामगुडे, कश्यप खखारिया, नैतिक पटवर्धन, आयुष रायकर, रेयांश जैन. ११ वर्षांखालील गट- मेधांश पुजारी, राघव पावडे, शौर्य भोंडवे, सर्वज्ञ बलगुडे, अगस्त्य कसाट. ९ वर्षांखालील-आरव झवर, अद्वैत कुलकर्णी, आदिराज डोईजड, अभिनंदन अरिकृष्णन, प्रियन साळुंखे. ५५ वर्षांवरील गट- सुहास कामतेकर, अतुल भालेराव, अशोक देसाई, गिरीश तोरवेकर. सर्वोत्तम रत्नागिरी जिल्हा खेळाडू सोहम रूमडे, साहस नारकर, अक्षय खेर, साईप्रसाद साळवी, मानस सिधये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.