कोकण

बांद्यात शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा

CD

बांद्यात शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा

विविध स्पर्धा; श्री स्वराज्य प्रतिष्ठानचा पुढाकार, सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः शिवजयंतीनिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिवगीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. चित्रकला व रंगभरण स्पर्धा ८ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १२ होणार आहे.
अंगणवाडी ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी, तसेच अकरावी ते खुला अशा पाच गटांत ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या तीन गटासाठी रंगभरण तर मोठ्या गटासाठी ‘शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग’ हा विषय आहे. खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट’ हा विषय आहे. ही स्पर्धा येथील पीएमश्री केंद्रशाळा क्र. १ येथे होणार आहे.
१४ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता येथील केंद्रशाळेत वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दुसरी ते चौथी गटासाठी ‘शिवरायांच्या नीतिमूल्यांची कथा’ हा विषय आहे. त्यासाठी ३ ते ४ मिनिटे वेळ आहे. पाचवी ते आठवी या गटासाठी ‘संस्काराचे व्यासपीठ राजमाता जिजाऊ’ आणि ‘स्त्री सन्मान आणि छत्रपती शिवराय’ हे विषय असून ५ ते ६ मिनिटे वेळ आहे. नववी ते बारावी या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायव्यवस्थेतील योगदान’ व ‘पर्यावरण रक्षक छत्रपती शिवाजी महाराज’ हे विषय आहेत. यासाठी ६ ते ७ मिनिटे वेळ आहे. खुल्या गटासाठी ‘शिवरायांचे विचार आणि युवा भारत’ व ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळातील वापर विचारासाठी की राजकारणासाठी’ हे विषय आहेत. यासाठी वेळमर्यादा ८ ते १० मिनिटे आहे.
८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ५ या वेळेत शिवगीत गायन स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुला अशा तीन गटांत होणार आहे. तिन्ही गटांसाठी ‘शिवगीत गायन’ हा विषय आहे. (पोवाडा ग्राह्य धरला जाणार नाही). १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव, सायंकाळी सहाला मुख्य सोहळ्याचे उद्‌घाटन व त्यानंतर वेशभूषा स्पर्धा होणार आहे. विश्वकला मंच ग्रुपचे बहारदार ऐतिहासिक सादरीकरण होणार आहे. वेशभूषा स्पर्धा अंगणवाडी, पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते दहावी या गटात होणार आहे. यासाठी ‘शिवकालीन वेशभूषा’ हा विषय आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी केदार कणबर्गी, संकेत वेंगुर्लेकर, शुभम बांदेकर यांच्याशी संपर्क साधावा.
यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, संकेत वेंगुर्लेकर, जे. डी. पाटील, नारायण बांदेकर, अनुप बांदेकर, शुभम बांदेकर, प्रथमेश राणे, कांता हळदणकर, वामन हळदणकर, अक्षय मयेकर, अनुज बांदेकर, तात्या स्वार, तनिष मेस्त्री, रीना मोरजकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजितदादा अमर रहे... कार्यकर्त्यांच्या घोषणा

Ajit Pawar: नियतीचा योगायोग! ज्या घड्याळानं सत्ता मोजली, राजकारणात नाव दिलं; त्याच घड्याळानं अजितदादांची शेवटची ओळख पटवली

Phulambri News : 'दादा मावशींना खूप मान द्यायचे..! फुलंब्रीत मावसभावाच्या आठवणींनी डोळे पाणावले

Baramati News : दादा...तुम्ही आम्हाला का सोडून गेला; बारामतीकरांचा मेडिकल कॉलेजच्या दारात हंबरडा

SCROLL FOR NEXT