कोकण

तंबाखू नियंत्रणासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज

CD

- rat21p19.jpg-
26O19239
रत्नागिरी ः तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील. शेजारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगळे आदी.
----
तंबाखू नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
आर. आर. पाटील ः रत्नागिरीत कार्यशाळेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून शासनाच्या सर्व विभागांनी सामूहिकरित्या काम करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत तंबाखू नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे सचिव तथा प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगळे आदी उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबातून विशेषतः मुलांपासून करावी व पुढे समाजातील इतर घटकांपर्यंत ही चळवळ पोहोचवावी, असे त्यांनी नमूद केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारांची माहिती दिली. तंबाखू सेवनामुळे मानवाचे आयुर्मान सरासरी दहा वर्षांनी कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षांत तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांच्या प्रसिद्धीमुळे तंबाखू सेवनाचे प्रमाण काही अंशी घटले असले तरी अद्याप व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिगारेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स ॲक्ट २००३ (कोटपा कायदा) तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT