कोकण

वैचारिक, तर्कशुद्ध मांडणी म्हणजे ‘वक्तृत्व’

CD

19243

वैचारिक, तर्कशुद्ध मांडणी म्हणजे ‘वक्तृत्व’

प्रा. वैभव खानोलकर ः खारेपाटण येथे स्पर्धेचे पारितोषिक वितरण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः वक्तृत्व म्हणजे केवळ व्यासपीठावर उभे राहून बोलणे नव्हे, तर आपण निवडलेल्या विषयाला वैचारिक अधिष्ठान देऊन त्याची तर्कशुद्ध मांडणी करणे होय. आजची तरुण पिढी ज्या प्रगल्भतेने आणि धाडसाने आपले विचार मांडत आहे, ते पाहून एक भारतीय नागरिक म्हणून सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्‌गार प्रा. वैभव खानोलकर यांनी काढले.
​खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जयंतीनिमित्त खारेपाटण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
प्रा. खानोलकर म्हणाले, ‘वक्तृत्व कलेमध्ये शब्दांपेक्षा विचारांचे वजन महत्त्वाचे असते. या स्पर्धेसाठी निवडलेले विषय आव्हानात्मक होते, ज्यातून विद्यार्थ्यांच्या खऱ्या वैचारिक क्षमतेची कसोटी लागली. याबद्दल स्पर्धा प्रमुख आणि सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करतो.’ या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील अनेक दिग्गज वक्त्यांनी सहभाग नोंदवला. त्यातून तनया पांचाळ हिने प्रथम क्रमांक मिळवून पेंढारकर चषकावर आपले नाव कोरले. ​द्वितीय क्रमांक सानिया यादव, ​तृतीय क्रमांक अथर्व पाध्ये-गोंधडे, ​उत्तेजनार्थ माधवी शेंगाळे व हर्षाली कानडे यांनी मिळविला.​ ​कार्यक्रमाचे उद्‍घाटन श्रीकृष्ण पाटणकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रवीण लोकरे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब राणे, सचिव महेश कोळसूरकर, सहसचिव राजेंद्र वरुणकर, खजिनदार संदेश धुमाळे, प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री. सानप, पर्यवेक्षक राऊत यांची उपस्थिती होती. प्रा. गोंधडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT