swt2110.jpg
19250
कुडाळ ः बाळकृष्ण पेडणेकरला पारितोषिक देताना अथर्व श्रृंगारे, दिग्विजय पवार, कौस्तुभ पेडणेकर, राजेंद्र तवटे, वरद प्रभू व इतर मान्यवर.
बुद्धिबळात बाळकृष्ण पेडणेकर अव्वल
कुडाळातील ‘सिंधुशौर्य’ स्पर्धा ‘अभाविप’ सिंधुदुर्गचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या सिंधुशौर्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई अकॅडमीचा बाळकृष्ण पेडणेकर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. ‘स्क्रीन टाईम ते ॲक्टिविटी टाईम’ या उपक्रमांतर्गत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविदयालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, ‘अभाविप’ चे दिग्विजय पवार, वरद प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात श्री. पवार यांनी स्पर्धा आयोजनामागील संकल्पना स्पष्ट केली. विदयार्थ्यांना स्क्रीन टाईमकडून ॲक्टिविटी टाईमकडे वळवण्याचा उददेश असल्याचे ते म्हणाले. प्रा. सुरवसे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना बुद्धिबळ हा खेळ आपल्या आवडीचा असल्याचे सांगितले. त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना अभाविपच्या उपक्रमाचे कौतुक केले. पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र वितरण दिग्विजय पवार, कौस्तुभ पेडणेकर, राजेंद्र तवटे, अथर्व श्रृंगारे, वरद प्रभू आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बाळकृष्ण पेडणेकर याने ५ फेऱ्यांमध्ये ४ फेऱ्या जिंकून व एक बरोबरीत सोडवून साडेचार गुण मिळविले. त्याला सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक वरद तवटे, तिसरा क्रमांक प्रथमेश रामाणे यांनी मिळवला. त्यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक, प्रशस्तीपत्र, रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व स्तरातून बाळकृष्णचे कौतुक करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.