कोकण

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ

CD

rat२१p६.jpg-
२६O१९१८९
रत्नागिरी : समर्थ अभियानाअंतर्गत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मागे उभे राजीव नगरकर, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रवीण जोशी, विशाखा भिडे आदी.
-----
आगाशे विद्यामंदिरचा ‘मनाचे श्लोक’मध्ये दबदबा
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ९१ विद्यार्थ्यांची निवड; २० शाळांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : समर्थ भारत अभियानांतर्गत मनाचे श्लोक पाठांतर रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धा कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरच्या नवीन इमारतीत पार पडल्या. यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ९१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या आगाशे प्राथमिक विद्यामंदिर व गोदावरीदेवी बियाणी बालमंदिर शाळेला पहिला क्रमांक तर जीजीपीएसला दुसरा क्रमांक मिळाला. सांघिक गुणांमध्ये फाटक हायस्कूलने पहिला आणि आगाशे विद्यामंदिराने द्वितीय, जीजीपीएसने तृतीय क्रमांक पटकावला.
पुण्यातील समर्थ भारत अभियान आणि सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘मन आणि मनगट’ या संकल्पनेवर या स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले. यात २० शाळांतील ४४० मुलांनी सहभाग घेतला. त्यातील २२५ मुले जिल्हास्तरावर निवड झाली. त्यातून ९१ विद्यार्थी निवडले गेले.
प्रमुख पाहुणे व गतवर्षीचे विजेते प्रवीण जोशी, विशाखा भिडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली ते दहावी व खुला गट आणि नंतर खेळघर व बालवाडी गटातील स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी परीक्षक व मार्गदर्शक म्हणून राजीव नगरकर हे पुण्याहून आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून ९१ मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धा १५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे. स्पर्धेच्या विभागप्रमुख डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी या कार्यासाठी कार्यकर्ते वाढवावे, असे पालकांना आवाहन केले. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पुढील वर्षी नगरपालिकेच्या शाळांचा सहभाग असेल, असे आश्वासन दिले. मनाचे श्लोक म्हणत प्रभातफेरी काढण्याची संकल्पना पुढील वर्षी राबवण्यात येणार आहे.
पर्णिका मुळ्ये, स्नेहल भट, श्रुती दाते, अनुराधा ताटके, उमा सरदेसाई, संपदा पेठे, पूर्वा तेरेदेसाई, जान्हवी साठे, पल्लवी मेहेंदळे, कीर्ती दाते, पूजा जोशी, रश्मी ठाकूर, गीता तांबे, शिला जोशी, नीलिमा वाड आणि स्मिता जोशी यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT