कोकण

इंग्रजीतून शिक्षण घेताना मातृभाषाही जपा

CD

19262

इंग्रजीतून शिक्षण घेताना मातृभाषाही जपा

शैलेश लाड ः मडुरा नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असली तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले तरीही मातृभाषेला कधीही विसरू नये. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांनी विषय समजून घेऊन विचारशक्ती विकसित करणाऱ्या शिक्षणावर भर द्यावा, असे प्रतिपादन उद्योजक शैलेश लाड यांनी मडुरा येथे केले.
मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावेळी गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, संस्था चेअरमन मंगेश कामत, सरपंच उदय चिंदरकर, ओंकार फाउंडेशन अध्यक्ष गुणेश गवस, रामचंद्र कुडके, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष प्रियांका परब, बांदा प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, शाळा समिती सदस्य विष्णू सावंत, मुख्याध्यापक नीती साळगावकर उपस्थित होत्या. गोविंद काजरेकर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून दिले. मंगेश कामत, रामचंद्र कुडके, गुणेश गवस यांनीही मार्गदर्शन केले. मुलांनी लिहिलेल्या ‘क्रिस्टल’ या हस्तलिखिताचे अनावरण श्री. लाड यांच्या हस्ते झाले. अहवाल वाचन सहशिक्षिका मयुरी कासार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेलांकनी रॉड्रीक्स, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वरा राठवड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death: महाराष्ट्र सुन्न! विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन, राज्यावर शोककळा

Pune News: मावळमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये थेट लढत; पंधरा जागांसाठी ४० जण रिंगणात, जिल्हा परिषदेचे १३, पंचायत समितीचे २७ उमेदवार!

Baramati Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCAने दिले अपडेट्स

Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी ! अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू, बारामतीत लॅंडिंग दरम्यान दुर्घटना

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

SCROLL FOR NEXT