बागायती खाक; भरपाई कधी?
शेतकऱ्यांचा प्रश्न; उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः विद्युत वाहिनीमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये पाच एकर बागायत जळून खाक होऊनही, दोन वर्षे योग्य नुकसान भरपाई न मिळाल्याने न्हावेली-चौकेकरवाडी येथील शेतकरी केशव चौकेकर सोमवारी (ता. २६) ‘महावितरण’च्या येथील उपविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले आहे.
चौकेकर यांच्या मालकीच्या ५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू आणि इतर फळझाडांचे २९ फेब्रुवारी २०२४ आणि ६ मे २०२५ रोजी लागलेल्या आगीत ९० लाखांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासनाकडून केवळ १ लाख ८७ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, ती अत्यंत कमी असल्याचा त्यांचा आरोप आहे. या अन्यायाविरोधात त्यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.
या उपोषणाद्वारे त्यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. जळित प्रकरणात झालेले ९० लाख रुपये नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी. उपजीविकेचे साधन नष्ट झाल्याने कुटुंबातील सदस्याला ‘महावितरण’मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळावी आणि अपघात टाळण्यासाठी जीर्ण झालेली विद्युत यंत्रणा इतर मार्गाने वळवण्यात यावी, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही ‘महावितरण’च्या दिरंगाईमुळे न्याय मिळत नसल्याचे चौकेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.