कोकण

आरोग्य सुदृढ तरच स्पर्धेत यश

CD

19299

आरोग्य सुदृढ तरच स्पर्धेत यश

प्रणित गावडे ः पाडलोस गाव ग्रुपतर्फे क्रीडा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः स्पर्धेच्या युगात यश मिळवण्याच्या नादात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि योग्य जीवनशैली यांचा अभाव निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यक्षमता व आयुष्यावर होतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवनशैली स्वीकारल्यासच खऱ्या अर्थाने यश टिकवता येते. आरोग्य सुदृढ असेल तरच स्पर्धेत टिकून राहता येते, असे प्रतिपादन पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे यांनी केले.
पाडलोस गाव ग्रुप व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आयोजित पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १,२,३ च्या एकत्रित बाल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, गाव ग्रुपचे सचिव अमेय गावडे, उपाध्यक्ष राजा आंबेकर, खजिनदार, बापू माधव, माजी मुख्याध्यापक गोपाळ करमळकर, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, भजनी बुवा अजित गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, मयुरी कुबल, उपाध्यक्ष सुधीर गावडे, शिक्षक विजय गावडे, अनिल वरक, अमोल प्रभू, देवेंद्र पालव, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. मंगळवारी (ता. २०) सकाळपासून दुपारपर्यंत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण स्पर्धांचे सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले. ग्रुपचे संस्थापक विश्राम गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. अमेय गावडे यांनी आभार मानले.
...................
मुलांसाठी झटणारा पाडलोस ग्रुप
सोशल मीडियावर अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. केवळ मेसेज न करता पाडलोस गाव व्हॉट्सअप ग्रुप शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. लहान मुलांच्या भवितव्यासाठी ग्रुपचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा शुभेच्छा देत सावंतवाडी येथील कमलेश ठाकूर यांनी वडील (कै.) पांडुरंग रामा ठाकूर यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य प्रदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT