कोकण

नावलेवाडी शाळेत रंगले कविता वाचन

CD

rat२१p८.jpg-
P२६O१९२०७
साखरपा : भडकंबा नवालेवाडी शाळेतील विद्यार्थी.

नवालेवाडी शाळेत
रंगले कविता वाचन
साखरपा ः भडकंबा येथील नवालेवाडी शाळेत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या निमित्त कविता सादरीकरण करण्यात आले. या निमित्त भडकंबा-नवालेवाडी शाळेत कवी लोणटकर हे खास उपस्थित होते. त्यांच्या हस्ते त्यांनी लिहिलेले कवितासंग्रह विद्यार्थ्यांना भेट देण्यात आला. कवी लोटणकर यांनी विद्यार्थ्यांना काव्यवाचन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी काही स्वरचित कविता वाचूनही दाखवल्या. या वेळी पाष्टेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभा जाधव यांनी आपली जिजाऊ ही कविता सादर केली. मुख्याध्यापिका अस्मिता शेंडे तसेच प्रभा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नवालेवाडी आणि पाष्टेवाडी शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

rat२१p९.jpg
२६O१९२०८
साखरपा : रोबोकॉन प्रदर्शनात सहभागी कबनूरकर स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षिका पल्लवी सावंत, गायत्री सावकार.

रोबोटिक प्रदर्शनात
कबनूरकर स्कूल
साखरपा ः नुकतेच संपन्न झालेल्या कोकण विभागीय रोबोटिक विज्ञान प्रदर्शनात येथील कबनूरकर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेतर्फे दोन रोबोटिक मॉडेल्स प्रदर्शनात मांडण्यात आली होती. स्काय रोबोटिक्सतर्फे कोकण विभागीय रोबोटिक विज्ञान प्रदर्शन रोबोकॉन २.० चे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील सर्वंकष विद्यामंदिर येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. स्काय रोबोटिक्सचे संचालक अभिजित सहस्रबुद्धे आणि कृष्णमूर्ती बुक्का यांच्या प्रयत्नातून रोबोकॉन २.० चे आयोजन करण्यात आले होते. याच संस्थेच्या माध्यमातून श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एआय लॅबची निर्मितीही दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होती. प्रदर्शनात कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोन रोबो प्रतिकृती सादर केल्या होत्या. प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थी मनस्वी कारेकर, जुनेद बोदले, आर्यन चिंचवलकर, इशान बोदले, हमजा देवळेकर आणि सौमित्र वाघधरे यांना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

निसर्गचित्र स्पर्धेला
कलाकारांचा प्रतिसाद
संगमेश्वर ः कोकणासारख्या स्वर्गभूमीत जन्मलो आहोत. इथला वारसा पाहिला तर निसर्ग आणि त्यास पूरक अशा ग्रामीण जीवनपद्धतीमुळे कोकण सर्वांसाठीच आकर्षित ठरला आहे. हा विषय डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब सरफरे विद्यालयात परिसरातील ग्रामीण जीवनदर्शन घडवणारी निसर्गचित्र स्पर्धा आयोजित केली गेली आहे, असे प्रतिपादन बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्था उपाध्याक्ष प्रताप देसाई यांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी केले. ४थी ते ५वी, ६वी ते ७वी व ८वी ते १०वी अशा तीन गटात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यामिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी ओंकार रामाणे यांनी काढलेले निसर्गचित्र सर्वांनाच आवडले. या स्पर्धेत प्रथम गटात अनुक्रमे रूही गांधी, ईश्वरी घडशी, शिवम दोरकडे तर उत्तेजनार्थ सावली बाईत व अर्पिता वाचम यांनी पारितोषिक पटकावले. द्वितीय गटामध्ये अनुक्रमे ईश्वरी कांगणे, ईश्वरी सुवरे, आयुष चव्हाण आणि उत्तेजनार्थ अवनीश वास्कर व अलमिरा वलेली यांनी पारितोषिक पटकावले तसेच माध्यमिक गटामध्ये अनुक्रमे ओंकार रामाणे, दिया खामकर, त्रिवेष बाचिम तर उत्तेजनार्थ सार्थक रामाणे व स्वर सुर्वे यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT