swt2117.jpg
19295
श्री गणेश
न्हावेलीत आज
दशावतारी नाटक
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २१ ः न्हावेली विवरवाडी येथील श्री देव गणपती मंदिरात उद्या (ता. २२) माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक, १० वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता भजने, रात्री ९ वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्यमंडळ माणगाव (ता. कुडाळ) यांचा ‘मुक्त झाली गंधर्वकन्या’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गणपती मंदिर सेवा समिती व विवरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.