swt2120.jpg
19320
सावंतवाडीः झोया शेख, झियाद शेख यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
जिल्हास्तर धावणे स्पर्धेत
झोया, झियाद शेखचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूलची दुसरीतील विद्यार्थिनी झोया शेख हिने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित ५० मीटर व १०० मीटर धावणे स्पर्धेत सबज्युनिअर गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच सहावीतील विद्यार्थी झियाद शेख याने ६० मीटर धावणे स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला.
या दोन्ही विद्यार्थ्यांची कोपरगाव-अहिल्यानगर येथे ७ व ८ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ, कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.