कोकण

लांजा-कुर्णेतील खुनाचा २४ तासांत छडा

CD

लांजा-कुर्णेतील खूनाचा छडा
मित्र जेरबंद ; शिवीगाळ केल्याचा रागातून कृत्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी/लांजा, ता. २२ : लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मात्र, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी मृताच्या मित्राला अटक करण्यात आली. नंदकुमार रवींद्र पांचाळ (वय २५, रा. कुर्णे सुतारवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे.
लांजा तालुक्यातील कुर्णे येथील रहिवासी सुरेश रामचंद्र पडये (वय ४५) यांचा मृतदेह १९ जानेवारीला त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. सुरुवातीला लांजा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती; मात्र, मृतदेहावरील जखमा आणि घटनास्थळी सांडलेले रक्त पाहून हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय बळावला. स्थानिक गुन्हे शाखेचे एक खास पथक तत्काळ लांजा येथे रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई मृतांचा मित्र नंदकुमार रवींद्र पांचाळ याच्याकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लांजा पोलिस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप ओगले, सहाय्यक फौजदार सुभाष भागणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील, अतुल कांबळे यांचा सहभाग होता.

शिवीगाळीच्या रागातून खून
सुरेश पडये यांनी संशयित आरोपी नंदकुमार याला शिवीगाळ केली होती. याच शिवीगाळीचा राग मनात धरून सुरेश यांच्या घरात जाऊन खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT