कोकण

हातखंबा येथील अपघातप्रकरणी स्वाराविरूद्ध गुन्हा

CD

हातखंबा येथील अपघातप्रकरणी स्वाराविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी ः हातखंबा रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकीने मोटारीला धडक दिली. या अपघातप्रकरणी स्वाराविरूद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक संदीप जोशी (रा. अंजणारी, जोशीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे स्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) सकाळी सहाच्या सुमारास हातखंबा येथील हॉटेल अलंकारच्या अलिकडील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोटार (क्र. एमएच-०८ ए.जी २३०६) वरील चालक अमोघ उल्हास मुळ्ये हे रत्नागिरी येथून तालुक्यातील कळझोंडी असे जात होते. पानवलफाटा ते हातखंबा येथे रस्त्याचे काम सुरू असताना रस्ता बंद करून दिशादर्शक बोर्ड लावून वाहतूक हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू होती म्हणून मोटारचालक अमोघ मुळ्ये हे हातखंबा ते रत्नागिरी रस्त्याने जात असताना समोरून एक ट्रक आला व त्या ट्रकला दुचाकी (क्र. एमएच-०८ बी एफ ६६१५) वरील चालक प्रतीक जोशी याने मोटारीला बाजू देताना दुचाकीने मोटारीच्या उजव्या बाजूला धडक देऊन अपघात केला.
-------------
कोंडगाव येथे हातभट्टी विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः कोंडगाव मच्छीमार्केट-देवरूख येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६३५ रुपयांची सहा लिटर दारू जप्त केली. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर चंद्रकांत शिंदे (वय ३८, रा. साखरपा, पत्कीवाडी ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) दुपारी पावणेएकच्या सुमारास कोंडगाव मच्छीमार्केटमधील चिकन दुकानाच्या बंद गाळ्याच्या मागील बाजूस आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताकडे ६३५ रुपयांची सहा लिटर विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू सापडली. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---------------
कुवारबाव येथील वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी ः किडनीचा आजार असलेल्या वृद्ध महिलेला श्वासाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी नाचणे येथील सांबरे हॉस्पिटल येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वैशाली गोपाळ डिगे (वय ६५, रा. सदासिंधू कॉम्प्लेक्स पत्रकार कॉलनी कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) सकाळी सव्वासातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT