कोकण

संगमेश्वरात दोन्ही शिवसेनेकडून अर्ज दाखल

CD

संगमेश्वरात दोन्ही शिवसेनेचे अर्ज दाखल
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः तालुक्यातील जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेतील उमेदवारांनी काल (ता. २१) उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यासाठी दोन्ही बाजुंनी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामध्ये माजी सदस्यांसह नव्या चेहऱ्यांचा सर्वाधिक समावेश होता.
तालुक्यातील मुचरी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या माधवी मनोहर गीते तसेच नावडी पंचायत समिती गणातून सुहास सोमा मायगडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने ताकदवान उमेदवार मैदानात उतरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधवी गीते यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे तर नावडी पंचायत समिती गणात पालकमंत्री उदय सामंत यांनी सुहास सोमा मायगडे यांना उमेदवारी दिली आहे. तालुक्यातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेच्या कोसुंब जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्या मुग्धा जनक जागुष्टे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. या गटात चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांचे लक्ष या गटाकडे लागले आहे. कडवई जिल्हा परिषद गटाचे सदस्य व रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे व धामणी पंचायत समितीसाठी दत्ताराम लाखण व कडवई पंचायत समितीसाठी अपर्णा जाधव यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT