swt221.jpg
19406
कुडाळ ः श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयातर्फे घेतलेल्या सुगम संगीत गायन, हामर्मोनियम वादन व तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)
संगीत परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
कुडाळात पारितोषिक वितरणः त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ः श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव विद्यालयातर्फे डिसेंबर २०२५ सत्रात घेतलेल्या सुगम संगीत गायन, हार्मोनियम वादन व तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावर्षीही एस. एस. सी. बोर्डाकडून दहावीच्या कला वाढीव गुणदानासाठी या विद्यालयाची निवड झाली आहे.
इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे (कुडाळ) पीटर शेरॉव, तबला सुगम संगीत अलंकार प्रमोद मुंडये, मिनिनाथ आडसरे यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून १५ वर्षांतील प्रगतीच्या वाटचालीची विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यालयाच्या संगीत क्षेत्रातील कार्याची प्रशंसा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
परीक्षेचा निकाल अनुक्रमे असाः गायन प्रथमा - मृण्मयी मोहिते, भाग्यश्री जांभेकर व प्रांजल पुराणिक (द्वितिय), अंजली जाधव तृतीय. गायन द्वितीया - भाग्यश्री जांभेकर, रुचा पिळणकर, दिया साटम व वीरभद्र देसाई (तृतीय), गायन तृतीया - चंद्रशेखर आचरेकर, कुशिवानी सर्वेकर व आर्या पुजारे (द्वितीय), लावण्या मेस्त्री, गायन मध्यमा - चिण्मयी पिंगुळकर, उपांत्य - सिद्धी डेगवेकर, श्रीकांत सुतार, जान्हवी हर्डीकर. हार्मोनियम वादन प्रथमा - मंजिरी सरंबळकर, चीर आडसरे, दुर्वा पाटकर व हर्षला कदम (तृतीय). द्वितिया - चंद्रशेखर आचरेकर, तृतीया - वेदांत पंडित. विशारद - ओजस्वी पिळणकर, तबला वादन प्रथमा - जय मुंडये, उपांत्य विशारद - अर्णव तळेकर, विशारद - जस्मित पिळणकर, नारायण राऊळ (प्रथम). अलंकार भाग २ - रिया नेमळेकर.
या विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये कुडाळ केंद्रातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले आहेत केंद्राचे संचालक राजाराम गव्हाणकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयामार्फत शिक्षक म्हणून हार्मोनियम वादन व गायनसाठी राजाराम गव्हाणकर, तबला वादनसाठी प्रमोद मुंडये यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपल्या कलागुणांना व्यासपीठ द्यावे, असे आवाहन विद्यालयातर्फे केले आहे.
विद्यालयाचे कुडाळ, पाट हायस्कूल, माणगाव, बॅ. नाथ पै हायस्कूल कुडाळ व न्यू इंग्लिश स्कूल सरंबळ येथे अभ्यास वर्ग सुरु आहेत. त्याचा विद्यार्थी व प्रौढांनीही लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. भास्कर गुंजाळ सर यांनी केले आहे. सचिव विजय भिसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.