19408
वैचारिक जीवनमूल्यांतून परिवर्तन घडवा
डॉ. प्रकाश परब ः कुडाळात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः स्पर्धेत तयारीनिशी भाग घ्या. बॅ. नाथ पै यांच्यासारखी विचारांची, जीवनमूल्यांची दृष्टी ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य तथा वझे कॉलेज मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रकाश परब यांनी केले.
बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन उमेश गाळवणकर, स्पर्धा परीक्षक सुधाकर वळंजू, सदानंद तावडे, प्रा. नितीन बांबडेकर, स्पर्धा संयोजक प्रा. अरुण मर्गज, नर्सिंग महाराजांच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, बी.एड्. प्राचार्य परेश धावडे आदी उपस्थित होते.
या वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. शालेय स्तरावर अनुक्रमे साक्षी साळकर (शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर), आरती राजाध्यक्ष (आरपीडी विद्यालय सावंतवाडी), श्रावणी आरवंदेकर (वेतोरे हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रणाली सोनवडेकर (रामेश्वर विद्यामंदिर बाव) व निरंजन कुशे (बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ) यांनी यश संपादन केले. महाविद्यालयीन स्तरावर रुपेश आळवे (व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ), संग्राम कासले (सुनीता देवी टोपीवाला डी.एड्. कॉलेज मालवण), रिया गिरकर (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) उत्तेजनार्थ संचिता करावडे (दादासाहेब वराडकर कॉलेज कट्टा), व नीता धुरी (फोंडाघाट महाविद्यालय फोंडा) यांनी क्रमांक मिळविले. जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते व चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजेत्यांना सन्मानित केले. अश्विनी परब यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले. मंदार जोशी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.