swt2211.jpg
19434
कुडाळः निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतली. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळात निवडणूक प्रक्रियेचा
निरीक्षक चौधरींकडून आढावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ः निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी आज येथील तहसील कार्यालयाला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील आणि अधिकारी उपस्थित होते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुंबई) अपर जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांची नियुक्ती कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. नियुक्त निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा निवडणूकविषयक बाबींसाठी संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.