कोकण

सिंचन वाढतेय; ऊस घटतोय

CD

swt2215.jpg
19461
वैभववाडी ः जिल्ह्यातील ऊसशेतीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.

सिंचन वाढतेय; ऊस घटतोय
सिंधुदुर्गातील स्थिती ः तोडणीची समस्या, वन्यप्राण्यांचा वाढलेला उपद्रव यासह अन्य कारणे
एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः जिल्ह्यात सिंचनक्षमता वाढत असली तरी गेल्या पाच-सात वर्षात जिल्ह्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र घटत असल्याचे समोर आले आहे. क्षेत्र आणि उत्पादनात गेल्या काही वर्षात निम्म्याने घट झाली आहे. तोडणीची समस्या, वन्यप्राण्यांचा वाढलेला उपद्रव यासह अनेक कारणे त्याला कारणीभूत ठरली आहेत.
असळज (ता. गगनबावडा जि. कोल्हापूर) येथे डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याची निर्मिती होण्यापुर्वी जिल्ह्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र हे तुटपुंजे होते. परंतु, कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, कुडाळ या तालुक्यांमध्ये ऊसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. हजार बाराशे हेक्टर असलेले क्षेत्र दहा बारा वर्षात १७०० हेक्टरवर पोहोचले. उत्पादन देखील १ लाख ५ हेक्टरवर पोहोचले. ज्यावेळी ऊसाचे क्षेत्र वाढत होते, त्यावेळी ऊस लागवड क्षेत्र होत असलेल्या परिसरामध्ये काही मोजकेच मध्यम, लघु प्रकल्प आकारास आले होते. परंतु, त्यानंतरच्या कालावधीत काही मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा करण्यास सुरूवात झाली. कालव्यांची कामे पुर्ण झाली. अनेक गावांपर्यत पाणी पोहोचले. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढणे अपेक्षित होते. परंतु, ऊसाचे क्षेत्र वाढण्याऐवजी वर्षागणीक कमी होत आहे. सिंधुदुर्गात बाळसे धरणाऱ्या ऊस शेतीला ग्रहण लागले आहे. क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही घटत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
जिल्ह्यात १७०० वरून ऊसाचे क्षेत्र आता ११०० हेक्टरवर पोहोचले आहे. ऊस लागवड क्षेत्रात ६०० हेक्टरपर्यत घसरली आहे. उत्पादन १ लाख पाच हजारावरून केवळ ५० हजार टनांपर्यत आले आहे. यावर्षी ऊसाचे उत्पादन ४० हजार टनापर्यत येण्याचा अंदाज आहे. ऊस लागवड क्षेत्रात नेमकी का घट झाली, याची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. ऊसतोडणी हे त्यातील सर्वात महत्वाचे कारण आहे. मागील पाच सहा वर्षापासून येथील शेतकऱ्यांच्या ऊसाची वेळेत तोडणी होत नाही. त्याचा मोठा फटका उत्पादनावर झाला. हेक्टर २५ ते ३० इतकेच उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले. त्यामुळे व्यावहारीकदृष्ट्या न परवडणारा वाटू लागला. त्यातच तोडणीकरीता अनेकांच्या हातापाया पडावे लागले. आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागतो. याशिवाय मागील दोन-तीन वर्षात गवे, माकड, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रचंड नुकसान ऊसशेतीचे हे प्राणी करीत आहेत. पावसाचे वाढलेले प्रमाण हे देखील ऊसशेतीला मारक ठरत आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार आणि लांबलेल्या पावसामुळे ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे एकीकडे जरी सिंचनाच्या मर्यादा वाढत असल्या तरी ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमीच होत जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दहा वर्षाचा आलेख तेच दर्शवित आहे. त्यामुळे ज्या ऊसशेतीपासून जिल्ह्याची आर्थिक उलाढाल २५ कोटीच्या जवळपास होती. ती आता खूपच कमी झाली आहे. शेती क्षेत्रासाठी ही बाब अतिशय धोकादायक मानली जात आहे.

कोट
जिल्ह्यात सुरूवातीला पाच सहा तोडणी यंत्रणा होत्या. परंतु, आता त्यात वाढ केली आहे. सध्या ४० तोडणी यंत्रणा कार्यरत आहेत. आतापर्यत १३ हजार टन ऊसाची तोडणी पुर्ण झालेली आहे. सध्या दररोजची आवक ५५० टन इतकी आहे. यावर्षी ४० हजार टन ऊस उत्पादनाचा अंदाज आहे.
- प्रकाश गुरव, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज, गगनबावडा
--------------
कोट
वेळेत तोडणी न होणे, वन्यप्राणी गवे, माकड, रानडुक्कर यांसह अन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि बदलते वातावरण यामुळे ऊसशेती संकटात सापडली आहे. सर्वच बाजूने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेती थांबविली आहे.
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
---------------
चौकट
एक नजर
* जिल्ह्यात दहा-बारा वर्षात ऊस लागवडीखालील क्षेत्रात ६०० हेक्टरची घट
* जिल्ह्याच्या ऊस उत्पादनात ६० हजार टनांची घसरण
* बदलत्या वातावरणामुळे हेक्टर उत्पादन ३० टन इतकेच
* भविष्यात ऊस लागवड क्षेत्र आणखी घटणार
* जिल्ह्याच्या कृषी उलाढालीवर विपरित परिणाम
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमध्ये जाहिरातबाजी! बाबा बंगालीनंतर भोजपुरी चित्रपटांच्या ऑडिशनचे फलक; नियमांना हरताळ

KVS Recruitment 2026: शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी! KVS मध्ये 987 स्पेशल एजुकेटर मेगा भरती लवकरच; जाणून घ्या वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

KDMC Mayor: राजकीय नाट्यावरचा पडदा अखेर उघडला! एकनाथ शिंदेंचा 'हा' शिलेदार होणार महापौर; केडीएमसी महापौर–उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट

झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? "असं नका करू" चाहत्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी नेते सुनील तटकरेंचा उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT