कोकण

वैभववाडीत ४० अर्ज वैध

CD

वैभववाडीत ४० अर्ज वैध
छाननी प्रक्रिया पूर्ण ः दोन अर्ज ठरले अवैध
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २२ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरीता दाखल करण्यात आलेल्या ४२ पैकी २ अवैध तर ४० उमेदवारी अर्ज वैध ठरले. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी वाजत गाजत दाखल केलेल्या सुनील नारकर यांचा अर्ज अवैध ठरला आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी १५ आणि पंचायत समितीच्या सहा जागांसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी सुर्यकांत पाटील, सहाय्यक निवडणुक अधिकारी विनायक पाटील यांच्या उपस्थितीत आज अकरा वाजता अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु झाली. कोळपे जिल्हा परिषदेपासून प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. यामध्ये ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुनील नारकर यांच्या अर्जासोबत परिपुर्ण शपथपत्र नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. याशिवाय उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मैत्री मयुर दळवी हिचा अर्ज देखील अवैध ठरला. मतदार यादीतील नाव आणि अर्जावर उल्लेख असलेले नाव यामध्ये तफावत आढळून आल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. जिल्हा परिषदेच्या १५ पैकी १४ अर्ज वैध ठरले तर पंचायत समितीच्या २७ पैकी २६ अर्ज वैध ठरले. उमेदवारांना उद्यापासून २७ पर्यत अर्ज मागे घेता येणार आहेत.

चौकट
ठाकरे शिवसेनेला कोळपेत धक्का
कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून सुनील नारकर यांनी वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, परिपुर्ण शपथपत्र न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस देखील बजावली होती. तरीदेखील त्यांनी शपथपत्राची पुर्तता केली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. ठाकरे शिवसेनेला तालुक्यात हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. तालुक्यातील कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेनेला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे तेथे भाजपाच्या साधना नकाशे या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT