कोकण

इन्सुलीत खासगी वाहनांची श्वान पथकाकडून तपासणी

CD

swt2219.jpg
19486
इन्सुली ः पोलिस तपासणी नाका येथे वाहनांची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

इन्सुलीत खासगी वाहनांची
श्वान पथकाकडून तपासणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळी तसेच लगतच्या गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटन स्थळांवर कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचा (ड्रग्स) वापर व वाहतूक होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून सतर्कता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर आज इन्सुली पोलिस तपासणी नाका येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. यावेळी बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग आणि बीडीडीएस पथक सिंधुदुर्गचे अधिकारी उपस्थित होते. तपासणी नाक्यावर श्वान पथकाच्या मदतीने खासगी आराम बस तसेच इतर खासगी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षिततेसह पर्यटन स्थळांवरील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अशा तपासण्या पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT