swt2225.jpg
19507
देवगड ः येथील किल्ला गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
(छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
‘ओंकार’ प्रधान रूप गणेशाचे...
माघी गणेश जयंती उत्साहात ः देवगडमध्ये दर्शनासाठी रिघ
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः तालुक्यात आज ठिकठिकाणी पारंपरिक पध्दतीने माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील किल्ला गणेश मंदिरामध्ये दर्शनासह महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, तालुक्यातील तळेबाजार, दाभोळे यांसह अन्य ठिकाणच्या गणेश मंदिरांमध्येही भक्तांची वर्दळ दिसत होती.
येथील किल्ला गणेश मंदिरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी वर्दळ दिसत होती. सकाळी मूर्तिपूजन व अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रम झाले. गणेश दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात रांग लागली होती. दुपारनंतर गर्दीत आणखी वाढ झाल्याचे चित्र होते. मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठीही गर्दी दिसत होती. स्थानिक मंडळी भाविकांच्या सोयीसाठी सतत धावपळ करताना दिसत होती. उद्योगपती नंदकुमार घाटे मंदिरात कार्यरत होते. दिवसभरात विविध मान्यवरांनी गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात पारंपरिक भजने सुरू होती. मंदिराकडे जाणार्या मार्गावरील वाहनांच्या वर्दळीत वाढ झाल्याचे दिसत होते. अधूनमधून वाहतूक कोंडी होत होती. मंदिराबाहेर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये, म्हणून दर्शन मार्गावर मंडप घालण्यात आला होता. मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला होता. मंदिर परिसरात काहींनी आपली दुकाने थाटली होती. दरम्यान, तालुक्यातील दाभोळे पोखरबांव, तळेबाजार तसेच वाडा परिसरातील गणेश मंदिरांतही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तेथेही व्यापार्यांनी आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे परिसराला काहीसे जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसत होते. दरम्यान, तालुक्यात अन्य ठिकाणच्या गणेश मंदिरांतही उत्सव साजरा झाला.
चौकट
जामसंडेत सोमवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिवर्षीप्रमाणे जामसंडे येथील सन्मित्र मंडळ आयोजित माघी गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत (ता.२६) उत्सव चालणार आहे. यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.