कोकण

देवगडात शिरगाव गटातील एक अर्ज अवैध; ६३ वैध

CD

देवगडात शिरगाव गटातील
एक अर्ज अवैध; ६३ वैध
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ः तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीतील आजच्या उमेदवारी अर्ज छाननीत शिरगाव जिल्हा परिषद गटामधील अपक्षाचा एक अर्ज अपात्र ठरला. त्यामुळे काल (ता. २१) दाखल झालेल्या पंचायत समितीच्या १४ जागांसाठीचे ३७ तर जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २६ असे एकूण ६३ उमेदवारी अर्ज पात्र ठरले असल्याची माहिती निवडणूक यंत्रणकेडून देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता.२७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३७ तर जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आलेल्या अर्जांची आज छाननी झाली. यावेळी शिरगाव जिल्हा परिषद गटामधील अपक्षाचा एक अर्ज अपात्र ठरला. आता पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३७ तर जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २६ असे एकूण ६३ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे.
काही गटामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे. निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता मंगळवारी (ता.२७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत बंडखोरांची समजूत काढली जाणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही मतदारसंघात थेट लढती असून दोनच उमेदवारी अर्ज दाखल आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवार प्रचाराला प्रारंभ करतील असे दिसते; मात्र मंगळवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल. बंडखोरांची समजूत काढून ते माघारी जाणार की कडवे आव्हान उभे करणार, याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT