कोकण

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

CD

दुचाकीच्या धडकेत
पादचारी जखमी
कणकवली : रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्‍तीला अज्ञात दुचाकीची धडक बसली. यात सुभाष तुकाराम कदम (वय ५३, रा. हळवल - रमाबाई आंबेडकर‌ नगर) हे जखमी झाले आहेत. हा अपघात हळवल येथे ‌२० जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास कणकवली-हळवल मार्गावर घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सुभाष कदम हे जानवली येथील सापळे शोरूम येथे काम करतात. सायंकाळी काम संपवून ते घरी जात होते. कणकवली हळवल मार्गावर रमाबाई आंबेडकर नगर येथे ते रस्ता ओलांडत होते, त्‍याचवेळी कणकवली ते कळसूलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने त्‍यांना धडक दिली. यात ते रस्त्यावर पडले. त्‍यांच्या डोक्याला, हाताला व पायाला दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने दुचाकीसह तेथून पलायन केले. याबाबत सुभाष कदम यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्‍यानुसार अनोळखी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT