19575
कोळोशी मधलीवाडीत
गणेश जयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः श्री गजानन विकास मित्र मंडळ, कोळोशी मधलीवाडी यांच्या वतीने आयोजित माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. प्रतिवर्षाप्रमाणे कोळोशी मधली वाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. २१ ला उत्सवाला प्रारंभ झाला.
मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी परिसर गजबजून गेला होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रात्री भजने पार पडली. रात्री ९ वाजता झालेल्या स्थानिक रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान मुलांनी आपली कला सादर केली. काल (ता.२२) पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती पार पडली. दुपारी मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ तसेच तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ३ ते ६.३० या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गणेश भक्त सहभागी झाले होते. त्यानंतर महाआरती व रात्री भजने झाली. रात्री लकी ड्रॉ सोडत पार पडली असून विजेत्यांना पैठणीचे वितरण करण्यात आले. रात्री १० वाजता श्री कमलाकर बोरकर लिखित व श्री कुलस्वामिनी नाट्य मंडळ, हडपिड निर्मित ‘हिरवा चुडा’ या तीन अंकी नाट्यप्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद लाभला. उत्सव यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल श्री गजानन विकास मित्र मंडळ, कोळोशी मधली वाडी यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.