कोकण

शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये जामसंडेचा आराध्य अव्वल

CD

19598
आराध्य राणे

शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये
जामसंडेचा आराध्य अव्वल

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जामसंडे नं. १ (ता. देवगड) येथील विद्यार्थी आराध्य राणे याने २८२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला.
प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्गमार्फत दरवर्षी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा मोफत घेतली जाते. यावर्षीही ही परीक्षा जिल्ह्यातील १४४ केंद्रांवर सुरळीत पार पडली. या परीक्षेच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्याची टॉप टेन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉप टेन गुणवंत विद्यार्थी अनुक्रमे असे ः आराध्य राणे, आराध्य आपटे (सावंतवाडी नं. २), पीयुष लाड (नेरूर, कुडाळ), उर्वी आठलेकर (सावंतवाडी नं. ४), राजनंदिनी सावंत (सावंतवाडी नं. ४), वृंदा आवडण (आरोंदा नं. १, ता. सावंतवाडी), स्वरा गुरव (असगणी नं. १, ता. मालवण), दीपश्री सावंत (इन्सुली नं. ५, ता. सावंतवाडी), यश परब (वजराट नं. १, ता. वेंगुर्ले), सई आरेकर (सावंतवाडी नं. २). टॉप टेन यादीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच जिल्हास्तरीय कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT