कोकण

राजापूर-राजापुरातील सहा अर्ज अवैध

CD

राजापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत सहा अर्ज अवैध
राजापूर, ता. २३ ः तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरूवारी तांत्रिक अडचणींमुळे सायंकाळी उशिरापर्यंत छाननी प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, छाननीमध्ये जिल्हा परिषद गटातीन दोन अर्ज तर पंचायत समिती गटातीन चार अर्ज असे सहा अर्ज अवैध ठरले आहेत.
राजापूर तालुक्यात वडदहसोळ, जुवाठी, धोपेश्वर, साखरीनाटे व कातळी या सहा जिल्हा परिषद गट व वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे व कातळी या १२ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. या अर्जाची छाननी गुरूवारी झाली. यामध्ये जिल्हा परिषद गणातील १९ पैकी १७ अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध तर पंचायत समिती गणातील ५१ अर्जापैकी चार अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. जुवाठी गटातून दीपक चव्हाण, शिवाजी कानडे यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. केळवली गणातून शिवानी कानडे यांचा अजै अवैध ठरला आहे तसेच धोपेश्वर गणातून योगेश नकाशे व नाटे गणातून नंदिनी कदम यांचा पक्षाकडून दाखल असलेला अर्ज अवैध ठरला आहे; मात्र अपक्ष अर्ज वैध ठरवला आहे. कातळी गणातील सुनील जठार यांचा एक अर्ज अवैध ठरला असून, दुसरा वैध ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT