rat23p1.jpg-
19564
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये आयोजित नाट्यलेखन, व्यवस्थापन कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. आनंद आंबेकर, डॉ. कल्पना आठल्ये व प्राध्यापक.
--------
‘गोगटे’मध्ये नाट्यलेखन, व्यवस्थापन,
कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम
रत्नागिरी, ता. २३ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विभागातर्फे ‘नाट्यलेखन आणि व्यवस्थापन’ कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम आयोजित केला. तीस तासांच्या अभ्यासक्रमात विविध शाखांतील ३२ विद्यार्थी सहभागी झाले.
यात मुंबईतील के. जे. सोमय्या विद्यापिठाच्या म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्राध्यापक आणि दिग्दर्शक डॉ. प्रसाद भिडे, कविकुलगुरू कालिदास संस्कृत अध्ययन केंद्राचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशांक पाटील, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, दिग्दर्शक प्रदीप तेंडुलकर, प्रवीण धुमक, जान्हवी पवार, गोव्याच्या पृथा परब या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.
या वेळी नाट्यलेखन, नाट्यप्रकार, नाट्यसमीक्षा, नाट्यवाचन, केशभूषा, रंगभूषा, नेपथ्य आणि वेशभूषा या विषयी प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले. नाट्यनिर्मितीसाठी आवश्यक अंगाचा अभ्यास कसा करावा हे सांगून केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य या विषयाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांनी करून घेतले. नाट्यक्षेत्रातील व्यावसायिक संधींविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अवगत कौशल्यांवर आधारित परीक्षा घेण्यात आली. समारोपावेळी डॉ. केळकर सभागृहात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बीपीए विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. वेदांग सौंदलगेकर, कला शाखा उपप्राचार्य आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.