कोकण

''आम्ही साहित्यप्रेमी''तर्फे ३० ला ''सुर्वे यांचे विद्यापीठ''

CD

19658

‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे
३० ला ‘सुर्वे यांचे विद्यापीठ’
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ : ''आम्ही साहित्यप्रेमी'' या साहित्यिक व्यासपीठाच्या जानेवारीतील मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी (ता.३०) सायंकाळी ५ वाजता ''सुर्वे यांचे विद्यापीठ'' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्यावर सखोल विचार मांडणार आहेत.
घुंगुरकाठी, सिंधुदुर्गप्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’चा हा सलग अकरावा मासिक उपक्रम असून, ओरोस येथील जैतापकर कॉलनीतील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रम होणार आहे. कवी नारायण सुर्वे हे मराठी साहित्यविश्वातील स्वतंत्र शैलीचे, मोजके पण अत्यंत प्रभावी लेखन करणारे प्रतिभावंत कवी म्हणून ओळखले जातात. १५ ऑक्टोबर १९२६ ला जन्मलेल्या सुर्वे यांचे २०२६ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. समाजातील दलित, उपेक्षित व संघर्षमय जीवन जगणाऱ्या माणसांचे वास्तव त्यांनी आपल्या कवितांतून समर्थपणे मांडले. ''ऐसा गा मी ब्रह्म'', ''माझे विद्यापीठ'', ''जाहीरनामा'', ''नव्या माणसाचे आगमन'' हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह होत. त्यांनी उर्दू साहित्यातील अनुवाद आणि इंग्रजीत निवडक कवितांचे भाषांतरही केले आहे. संवादमय शैली आणि संघर्ष करणारा सामान्य माणूस हे त्यांच्या कवितेचे केंद्रबिंदू राहिले. या कार्यक्रमात संध्या तांबे सुर्वे यांच्या कवितेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून, उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : लग्नात ५० तोळे सोनं, नंतर ३५ लाख रोकड दिली, मुलगा हवा म्हणून गर्भपात करायला लावला; इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जानेवारी 2026

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी, पावसाची होणार एन्ट्री, आज तुमच्या भागात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Yogi Government : योगी सरकारचा मोठा प्लॅन; उत्तर प्रदेशात ग्रामीण अर्थव्यवस्थेची धुरा आता महिलांच्या हाती

आजचे राशिभविष्य - 27 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT