कोकण

श्री देवी सातेरीच्या दर्शनाने महायुतीतर्फे प्रचाराचा प्रारंभ

CD

19703

श्री देवी सातेरीच्या दर्शनाने
महायुतीतर्फे प्रचाराचा प्रारंभ

आडेलीत कार्यकर्ते एकवटले

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ ः आडेली (ता. वेंगुर्ले) जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ वेतोरे गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन करण्यात आला. आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी रिंगणात असलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी व वायंगणी पंचायत समिती सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या शीतल राऊत या महायुतीच्या उमेदवारांनी श्री देवी सातेरीचे आशीर्वाद घेऊन प्रचारास आज सुरुवात केली. यावेळी सर्वांनी श्री देव वेतोबाचेही दर्शन घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, भाजप तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक, भाजपा जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, दाभोली सरपंच उदय गोवेकर, श्रीकृष्ण बांदवलकर, वेतोरे उपसरपंच तुषार नाईक, ग्रामपंचायत सदस्य नितीन गावडे, विरोचन धुरी, विनायक गावडे, संतोषी गावडे, संगीता नाईक, साक्षी राऊळ, विक्रांत सावंत, सुधीर गावडे, प्रशांत नाईक, सुजाता वालावलकर, भाजप युवा पदाधिकारी सौरभ समीर नाईक, प्रशांत प्रभूखानोलकर, यतीन आवळेगावकर, विजय वालावलकर, संदीप नाईक, यशश्री नाईक, प्रकाश गावडे, योगेश नाईक, सीताबाई शिरोडकर, सिद्धेश राऊळ, सातेरी वाचनालयाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण वेतोरकर आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill: वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT