कोकण

कोल्हापुरात ३० पासून ‘दालन २०२६’ प्रदर्शन

CD

19793

कोल्हापुरात ३० पासून
‘दालन २०२६’ प्रदर्शन

पवन जामदार ः विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः क्रीडाई कोल्हापूर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन ‘दालन २०२६’चे आयोजन ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महासैनिक दरबार हॉल ग्राउंड, कोल्हापूर येथे केले आहे. हे १३ वे दालन प्रदर्शन असून, विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सेमिनार, व्याख्यान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती सह-समन्वयक पवन जामदार यांनी दिली.
या चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात १७० स्टॉल्स असून सर्व स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. प्रदर्शन रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार आहे.
येथील स्पाईस कोकण येथे आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दालनचे सिंधुदुर्ग क्रीडाई अध्यक्ष गजानन कांदळगावकर, कोल्हापूर सह-खजिनदार सागर नालंग, केतन शहा, शेलेद्र अलमन, अभय वालावलकर, अभिजित जैतापकर उपस्थित होते. जामदार म्हणाले, ‘या दालनात शनिवारी (ता. ३१) सायंकाळी ४.३० वाजता कोल्हापूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रा. एम. जी. गाडगीळ (मुंबई) यांचे टेक्निकल सेमिनार, १ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता अच्युत गोडबोले (केमिकल इंजिनिअर) यांचे सेमिनार तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दालनला भेट देऊन संवाद साधणार आहेत. तसेच २ फेब्रुवारीला सायंकाळी सहाला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

Harish Rana Case: इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणांच्या कुटुंबाला योगी सरकारचा मोठा आधार! उत्पन्नासाठी दुकानही देणार

SCROLL FOR NEXT