कोकण

रथसप्तमी निमित्त १ लाख १५ हजार सूर्यनमस्कार

CD

-rat२४p६.jpg-
२६O१९७८३
रत्नागिरी : आजवर १३ लाख सूर्यनमस्कार पूर्ण करणारे विश्वनाथ बापट यांचा सन्मान करताना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा सुर्वे. सोबत प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर.
-rat२४p७.jpg-
२६O१९७८४
रत्नागिरी : सूर्यनमस्कार यज्ञाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
--------
रथसप्तमीनिमित्त १ लाख १५ हजार सूर्यनमस्कार
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन ; जिल्ह्यातील २५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे रथसप्तमीनिमित्त १ लाख सूर्यनमस्कार यज्ञ हा उपक्रम जवाहर मैदानावर उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे झाला. सकाळी ६ ते ९ या कालावधीत २५०० विद्यार्थ्यांच्या सहभागातून १ लाख १५ हजार ४३० सूर्यनमस्कार पूर्ण केले.
या उपक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, रत्नागिरी नगर परिषद, सहसचिव श्रीकांत दुदगीकर, महेश नाईक, जिमखाना अध्यक्ष चंद्रशेखर केळकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर हे मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सूर्यनमस्कार हा फक्त व्यायाम नसून आरोग्य, शिस्त व भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून, नियमित सूर्यनमस्कारामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होते, असे सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या उपक्रमात संस्था पदाधिकारी, शिक्षक-कर्मचारी तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रा. भा. शिर्के प्रशाला, सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल, बाबासाहेब नानल गुरुकुल व कै. बाबुराव जोशी गुरुकुल या संस्थांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमधील ८४ विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेत सूर्यनमस्कार घातले. या प्रसंगी योगशिक्षक श्रीकांत ढालकर यांनी सूर्यनमस्कार व योगाभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. अॅड. बाबासाहेब नानल गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी योगासने व सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
आजवर आपल्या आयुष्यात १३ लाख सूर्यनमस्कार पूर्ण केलेल्या विश्वनाथ बापट यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व शाळांतील क्रीडाशिक्षकांनी नियोजनबद्ध व अथक परिश्रम घेतले.
--------
कोट १
रथसप्तमीनिमित्त आयोजित लक्ष्य सूर्यनमस्कार यज्ञात सहभागी होण्याचा अनुभव अतिशय प्रेरणादायी होता. सकाळी लवकर उठून इतक्या मोठ्या संख्येने सर्वांनी एकत्र सूर्यनमस्कार करणे, ही अभिमानाची बाब आहे. या उपक्रमामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक एकाग्रताही वाढली.
-सोहम बंडबे, नानल गुरूकुल.
--------
कोट २
या सूर्यनमस्कार यज्ञात सहभागी होताना ऊर्जा, शिस्त आणि सकारात्मकतेचा अनुभव आला. योगासने व सूर्यनमस्कारामुळे आरोग्याचे महत्त्व प्रत्यक्षात जाणवले. असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार वाटतात.

- जान्हवी भुवड, इ. नववी, फाटक प्रशाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : 1st ball, 1st wicket! जसप्रीत बुमराहच्या भन्नाट चेंडूवर टीम सेइफर्टचा उडाला त्रिफळा, Video पाहून थक्क व्हाल

Pune Crime News : सोरतापवाडीच्या महिला सरपंचाच्या घरात हुंडाबळीचा धक्कादायक प्रकार, सुनेने संपवले जीवन; पोलिसांत गुन्हा दाखल

Fire News: फर्निचर दुकानाला भीषण आग; पाच जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील लोकांचा समावेश

Jalna Crime News : जालना जिल्हयातील पारनेर येथे बहिणीला चिठ्ठी का दिली म्हणत अठरा वर्षीय पवन बोराटे याचा पोटात चाकू मारून केला खून

IND vs NZ 3rd T20I : हार्दिक पांड्याचा अविश्वसनीय झेल! किवी फलंदाज हर्षित राणासमोर पाचव्यांदा झाला फेल Video

SCROLL FOR NEXT