-Rat२४p३. jpg-
P२६O१९७८०
मंडणगड : महाविद्यालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचा आनंद घेताना विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी.
-------
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन वाढवावे
डॉ. वाल्मीक परहर ः मुंडे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २४ ः पुस्तकांचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आहे. अवांतर वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, वेळेचा सदुपयोग घडतो तसेच चांगले-वाईट यातील फरक समजतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील वाचन साहित्याचा नियमित वापर करून अधिकाधिक ज्ञान संपादन करावे, असे प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांनी सांगितले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त ग्रंथालय विभाग व मराठी भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. संगीत घाडगे, डॉ. सूरज बुलाखे, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, प्रा. महादेव वाघ, प्रा. सलील मिशाळे, प्रा. रिदा चिमावकर, प्रा. प्राची कदम आदी उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या शासनाच्या संस्थांनी प्रकाशित केलेले कोश, विविध खासगी प्रकाशनांची पुस्तके, चरित्रग्रंथ, संदर्भग्रंथ, शब्दकोश, इतिहास, मराठी ललित साहित्य तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके मांडण्यात आली होती. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि वाचकांनी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.