कोकण

रत्नागिरीत पदयात्रेतून जनजागृती

CD

-rat२४p४.jpg-
P२६O१९७८१
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित जनजागृती पदयात्रेत सहभागी संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी.
--------
जलसंवर्धन, सायबरबाबत पदयात्रेतून जागृती
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय; तीन हजार विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पदयात्रेतून जनजागृती केली. पदयात्रा कार्यक्रमाला अमली पदार्थविरोधी जनजागृती, प्रदूषणमुक्ती, निसर्ग संवर्धनासारख्या सामाजिक विषयावर फलक, घोषवाक्य व संदेशाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
भ्रष्टाचार निर्मूलन, सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, पाणीटंचाई व जलसंवर्धन, राष्ट्रीय सुरक्षा, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण, स्त्री सुरक्षा स्वच्छता पर्यावरण व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरही प्रबोधन करण्यात आले.
पदयात्रेचे उद्‍घाटन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन व उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर यांनी श्रीफळ वाढवून केले. कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रा. महेश नाईक, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रा. विद्याधर केळकर, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. दिलीपकुमार शिंगाडे, शिल्पा तारगावकर आणि प्राध्यापक, कर्मचारी, एनएसएसचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, सायबर गुन्हे व सुरक्षा यांचे पोलीसदल, घटक संस्थांमधील विद्यार्थी व शिक्षक असे सुमारे तीन हजार जण पदयात्रेमध्ये सहभागी झाले.
----------
चौकट १
रत्नागिरीकरांकडून कौतुक
या पदयात्रेची लांबच्या लांब रांग पाहून आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून रत्नागिरीकर कौतुक करत होते. पदयात्रेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह, स्वयंशिस्त, उत्तम नियोजन दिसून आले. जवाहर मैदान येथून सुरू होऊन लाला कॉम्प्लेक्स, जेलरोड नाका, माळनाका, मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा याच मार्गाने ढोलताशांच्या गजरात महाविद्यालयापर्यंत येऊन पदयात्रेचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT