कोकण

मुंबईत राज्यस्तरीय ५३ वे अधिवेशन

CD

मुंबईत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अधिवेशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५३वे राज्यस्तरीय अधिवेशन ९ फेब्रुवारीला चेंबूर, मुंबई येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली.
या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने व सरचिटणीस शिवाजी खांडेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. केळकर यांनी सांगितले की, या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्ष्मीप्रमाणे लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील भरती, जुनी पेन्शन योजना, वैद्यकीय रजा देयके आदी अनेक महत्त्वाचे प्रश्न शासनदरबारी प्रलंबित असून, त्यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. तसेच संघटनेची पुढील ध्येयधोरणे निश्चित करण्यात येणार आहेत. अधिवेशनास रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर, अमोल लिंगायत, मंगेश सावंत, राजू झगडे, संतोष शिंदे, उमेश दळवी, संजय पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT